मुस्लिम मतदारांची एकजूट ; अतुल सावे समोरील अडचणी वाढल्या

औरंगाबाद: औरंगाबाद पूर्व मधून निसटता विजय मिळवणाऱ्या अतुल सावे यांना यावेळी एमआयएमचे कडवे आव्हान राहणार आहे. सावे यांनी मुस्लिम मत विभाजनासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. असे असले तरी मुस्लीम मते एकठा महायुतीच्या विरोधात जाणार असल्यामुळे अतुल सावे यांची विजयाची वाटचाल मात्र खडतर होणार आहे.

2014 मध्ये अतुल सावेनी काँग्रेस आणि एमआयएमच्या लढतीत निसटत्या विजय मिळवला. यावेळी निवडणुकीचे गणित जुळवून अतुल सावे यांनी विजयासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. एमआयएम आणि वंचित यांच्यातील पडलेली फूट याचा फायदाही घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे मात्र लोकसभेत प्रमाणे एकटा मतदान हे मुस्लिमांचे एमआयएम किंवा समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पूर्व मतदारसंघातून 13 मुस्लीम उमेदवार उभे आहे यासह अकरा बहुजन व दलित समाजातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. यामुळे मुस्लिम आणि दलितांच्या मतांची मोठ्या प्रमाणावर विभाजन होईल हीच शक्यता बाळगून सावे प्रचार करीत आहे असे असले तरी सध्याचे चित्र मात्र वेगळेच आहे. मुस्लिम आंतर पे एकजुटीचा नारा देण्यात येत आहे. यासह शेवटच्या टप्प्यात सर्व उमेदवार एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत.

असे झाल्यास एमआयएमचा उमेदवार सहजासहजी विजय मिळवू शकतो व साबळे यांना पराभवाला सामोरे जाण्यास जावे लागण्याची शक्यता जास्त आहे.सध्या जरी मुस्लिम उमेदवार एकमेकाच्या विरोधात प्रचार करत असले तरी समाज म्हणून ते एकजूट करण्याचा प्रयत्न काही मुस्लीम समाजातील शिक्षित लोक करत आहेत.आणि वाढ मुस्लिम वंचितांची वाढती एकजूट ही अतुल सावे यांच्या पराभवाची कारणे ठरू शकते असे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

महत्वाच्या बातम्या