कुर्डूवाडीत आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

कुर्डूवाडी – हर्षल बागल : मुस्लीम समाजाला लोकसंख्या प्रमाणे १२% आरक्षण मिळावे, हज ला लावलेली जी.एस.टी.माफ करावी, व मेगा भरतीत मुस्लीम समाजाला जागा आरक्षित कराव्यात यासाठी कुर्डूवाडी मुस्लीम समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयात मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे निवेदन प्रांताधिकारी मारुती बोरकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना आजच शासनाला काळवितो असे आश्वासन दिले. यावेळी नगराध्यक्ष समीर मुलाणी, नगरसेवक आयुब मुलाणी, डॉ. मोहसीन मकनु, प्रा. मिट्टूमियाँ शेख, मक्का मजिद सदर वाहेद शेख आदींनी आपल्या भाषणातून विविध मागण्या शासनदरबारी मांडल्या.

मोर्चाची सुरवात माढा रोड पंचायत समिती जवळून सुरवात झाला शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा प्रांत कार्यालयाजवळ पोहचल्यावर भाषणे झाली. मोर्चा साठी मक्का मशिदीचे नायब सदर किफायत शेख, जामा मशिदीचे सदर नासर दाळवाले, हाजी रहमत बागवान, मदिना मशिदीचे सदर सिराज शेख, शब्बीर शेख, गुलशन ए रजा मशिदीचे सदर हाजी दादा शेख, हाजी दाऊद शेख, साजिद शेख, वलीमोहमद मुलाणी, हाजी लतीब बागवान, हाजी नजीर तांबोळी, हाजी खुदुस शेख, नगरसेवक अरुण काकडे, महेश पाटणे, सचिन वाळके, दिलीप उकरंडे, विशाल मोरे, जितेंद्र गायकवाड, अल्लाहुसेन शिकलकर, उमरसाहेब दारुवाले, वसीम मुलाणी, हमीद शिकलकर, फय्याज बागवान, आखलाक दाळवाले, जमीर पठाण, इकबाल शिकलकर, वाजीद कुरेशी, अमीर मुलाणी, नासीर बागवान, जावेद शेख, आरशाद मुलाणी, रजत शेख, बट्टी शेख, शाकीर शेख, आयुब दाळवाले, शफी शेख, मुबीन बहामद, निहाल शेख, मुजीब शेख, आशपाक पठाण, पप्पू मुलाणी यांच्यासह तमाम मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुलींची विक्री करणा-या टोळीतील आणखी दोघांना अटक

हातात भगवा घेऊन मुस्लीम बांधव मराठा क्रांती मोर्चात सहभागी…