मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर

Maratha Karnti Morcha

राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचा जोर वाढतोय. यात आता मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी इतरही जाती समुह रस्त्यावर उतरू लागलेत. बारामतीत आज मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. बारामतीतील प्रांताधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला गेला.

या मोेर्चात मुस्लिम, मराठा यांच्यासह सर्व जातीधर्मांचे लोक सहभागी झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनासाठी व फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाला व त्यासाठी मराठा क्रांती मोर्चा कडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. व मुस्लिन समाज मराठ्यांसोबत असण्याची ग्वाही दिली. आंदोलनानंतर सकल मराठा समाजातर्फे मुस्लिम बांधंवांचे आभार मानण्यात आले.

या मोर्चात कार्यकर्त्यांनी फडणवीस सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या. व लवकरात लवकर  मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.