fbpx

राममंदिरासाठी अध्यादेश काढण्याचा प्रयत्न झाला तर त्याला न्यायालयात आम्ही आव्हान देऊ : मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

RamMandir

टीम महाराष्ट्र देशा- अयोध्येत राममंदिराच्या उभारणीसाठी अध्यादेश काढण्याचा आणि ‘ट्रिपल तलाक’बाबत संसदेत कायदा करण्याचा प्रयत्न झाला तर त्याला न्यायालयात आम्ही आव्हान देऊ असा इशारा ‘ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डा’ने आज एका पत्रकार परिषदेतून दिला.

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारी समितीची एक बैठक झाल्यानंतर त्यातील ज्येष्ठ सदस्य रसुल इलियास यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, केंद्र सरकारने ट्रिपल तलाकच्या मुद्दय़ावर अध्यादेश काढला आहे. त्याची मुदत सहा महिने आहे. ती उलटून गेली तर काही प्रश्नच नाही, पण त्याचे कायद्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला तर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

सरकारला सत्य सांगणारे नको तर होयबा हवेत – उद्धव ठाकरे