ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी गळा भेट न घेण्याचं आवाहन

वेबटीम : उत्तर प्रदेश मध्ये सध्या स्वाईन फ्ल्यू ने चांगलच थैमान घातले आहे.अनेक नागरिक स्वाईन फ्लूमुळे त्रस्त आहेत.त्यातच बकरी ईद हा सण देखील आहे. पार्श्वभूमीवर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य माशूर सुन्नी मौलाना खालिद रशीद फिरंगीमहली यांनी मुस्लिमांनी एकमेकांची गळाभेट घेऊ नये असं आवाहन केलं आहे.

उत्तर प्रदेश सध्या स्वाईन फ्लूच्या विळख्यात सापडलाआहे.राज्यात सर्वत्र स्वाईन फ्लूचे रुग्ण सापडत आहेत.अशा पार्श्वभूमीवर बकरी ईद हा मुस्लिम धर्मियांचा सण आला आहे.मुस्लिम धर्मीय लोक एकमेकांना शुभेच्छा देताना गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात मात्र स्वाईन फ्लू ची लागण होऊ नये म्हणून माशूर सुन्नी मौलाना खालिद रशीद फिरंगीमहली यांनी हे फर्मान काढले आहे.गळाभेट घेऊन शुभेच्छा देताना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे तसेच गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्याऐवजी फक्त सलाम करून शुभेच्छा देण्यात याव्यात असं देखील आवाहन करण्यात आलं आहे.