मुस्लीम संघटनांनी केला पठाण यांचा निषेध, शीर कलम करणाऱ्याला देणार 11 लाख रुपयांचे बक्षीस

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत.ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून बोलले, आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटीला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट! अशा इशारा दिला. त्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...

आता तर पठाण यांच्या विरोधात मुस्लीम संघटनाही आक्रमक झाल्या असून पठाण यांचे शीर कलम करणाऱ्याला या संघटनेकडून बक्षीस जाहीर कऱण्यात आले आहे.वारिस पठाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शुक्रवारी बिहारमधील मुजफ्फरपूर येथे हिंदू आणि मुस्लीम संघटनांनी आंदोलन केले. पठाण यांच्या वक्तव्यावर अनेक मुस्लीम संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर मुजफ्फरपूर येथील अल्पसंख्यांक सामाजिक संघटनेने वारिस पठाण यांचे शीर कलम करणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. एक-ए-हिंदुस्थान मोर्चा नावाच्या सामाजिक संघटनेचे संयोजक तमन्ना हाशमी यांनी पठाण यांचे वक्तव्य देशविरोधी असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आलीय. विशेष म्हणजे, यापूर्वी याच वक्तव्यासाठी पठाण यांच्या वक्तव्याविरोधात पुण्यामध्येही तक्रार दाखल झालीय. आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत घृणा निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून टीका करण्यात आली. इतकंच नाही तर पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही पठाण यांच्यावर कारवाई करत त्यांना मीडियाशी बोलण्यापासून बंदी घातली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात