fbpx

मुस्लिमांना विश्वास नाही म्हणून तिकीट पण नाही , भाजप नेता बरळला

टीम महाराष्ट्र देशा : आता देशभरात लोकसभा निवडणुकीची चांगलीच धामधूम पहिला मिळत आहे.तसेच या धामधुमीत काही वाचाळवीर बॉम्ब फोडताना दिसत आहेत. एका प्रचार रॅली दरम्यान अशाच एका भाजप नेत्याने मुस्लिमांना तिकीट देत नाही. कारण मुस्लीम आमच्यावर विश्वास ठेवत नाही असे वक्तव्य केले आहे. कर्नाटक भाजपाचे वरिष्ठ आणि जबाबदार नेते आणि माजी उपमुख्यमंत्री केएस ईश्वरप्पा यांनी हे वक्तव्य केले आहे.

ईश्वरप्पांनी हे विधान कोप्पलमध्ये कुरबा आणि अल्पसंख्याक समुदायाला संबोधित करताना केलं आहे. ते म्हणाले की, काँग्रेसनं मुस्लिमांचा फक्त वोट बँक म्हणून वापर केला आहे. तसेच कॉंग्रेसने मुस्लिमांना तिकीटसुद्धा दिलं नाही. आम्ही मुस्लिमांना तिकीट देत नाही, कारण तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवत नाही. आमच्यावर विश्वास ठेवा मगच आम्ही तुम्हाला तिकीट आणि इतर गोष्टी देऊ. असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान केएस ईश्वरप्पा हे भाजपाचे वरिष्ठ नेते असून त्यांनी कर्नाटकातील जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देखील भूषवले आहे. कर्नाटकातील 14 लोकसभा जागांसाठी 18 एप्रिलला आणि इतर 14 जागांसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे. 70 वर्षी ईश्वरप्पा हे कुरुबा समुदायाचं प्रतिनिधित्व करत आहेत.