fbpx

मुस्लीम महिलांनी पुरुषांच्या मांड्या दिसतात म्हणून पुरूषांचे फूटबॉलचे सामने बघू नये

burkha

टीम महाराष्ट्र देशा: मुस्लीम महिलांनी पुरुषांच्या मांड्या दिसतात म्हणून पुरूषांचे फूटबॉलचे सामने बघू नये असा अजब फतवा लखनौ येथील दारूल उलूमच्या एका ज्येष्ठ मुफ्तींनी काढला आहे. अर्ध्या पँटमध्ये पुरूष फूटबॉल खेळतात, त्याखाली त्यांचे शरीर उघडे असते, अशा पुरूषांना बघणे इस्लामच्या शिकवणुकीविरोधात असल्याचे मुफ्ती अथार कासमी यांनी म्हटले आहे. दारूल उलूम ही सुन्नी मुस्लीमांची आशियातली सगळ्यात मोठी धार्मिक संस्था आहे. कासमी हे तिथं मुफ्ती असल्यामुळेच त्यांच्या या अशा विचित्र फतव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

महिलांना फूटबॉलचे सामने बघण्याची गरजच काय असा प्रश्नही कासमींनी विचारला आहे तसेच पुरूषांच्या मांड्या बघून त्यांना कशाचा लाभ होणार आहे असा प्रश्नही त्यांनी विचारला. महिलांचं लक्ष फक्त मांड्यांकडे राहील आणि त्यांना सामन्याचा स्कोअरदेखील सांगता येणार नाही असंही कासमी म्हणाले आहेत. तसेच जे पुरुष आपल्या बायकांना टिव्हीवर फूटबॉलचे सामने बघू देतात, त्यांच्यावर देखील कासमी यांनी टीका केली आहे.