जकार्ता : गेल्या वर्ष भरापासून जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घटल असून अनेकांचे या आजाराने बळी गेले आहेत. जवळजवळ सर्वच देशांत कोरोनाने कहर माजवला आहे. सध्या राज्यात कोरोनाचे भय कमी झाले असले तरी संकट मात्र कायम आहे. काही दिवसांपासून कोरोना लसींबाबत दिलासादायक वृत्त हाती येत आहेत. मात्र, आता या लसीला मुस्लिम-ज्यू धर्मगुरूंचा विरोध असल्याचं वृत्त काही वाहिन्यांनी दिलं आहे.
ऑक्टोबरमध्ये इंडोनेशियातील राजनैतिक अधिकारी आणि मुस्लिम धर्मगुरु चीनमध्ये गेले होते. राजनैतिक अधिकारी लसीचे डोस मिळविण्यासाठी गेले होते, तर धार्मिक नेते कोरोना प्रतिबंधक लस इस्लामिक कायद्याच्या नियमात बसते का, याची चाचपणी करण्यासाठी गेले होते. लस तयार करताना डुकराच्या मांसापासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. साठवणूक आणि वाहतुकीदरम्यान लस सुरक्षित आणि परिणामकारक राहण्यासाठी हे जिलेटिन स्टॅबिलायझरची भूमिका निभावते. मुस्लिम आणि ज्यू धर्मियांमध्ये डुकराचे मांस निषिद्ध असल्याने या जिलेटीनच्या वापरावर काही गटांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यामुळे काही देशांमध्ये लसीकरण मोहिमेला अडथळा येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडं, याच धर्मांमधील इतर अनेक तज्ज्ञांनी आणि गटांनी लस वापरण्यास कोणतीही हरकत उपस्थित केलेली नाही. डुकराच्या मांसापासून (पोर्क) तयार केलेल्या जिलेटिनचा लसनिर्मितीमधील वापर हा अनेक वर्षांपासूनचा वादाचा मुद्दा असून अनेक कंपन्या ‘पोर्क-मुक्त’ लसीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्वित्झर्लंडमधील नोव्हार्तीस कंपनीने मेंदूविकारावर अशी लस विकसीत केली असून सौदी अरेबियाही तसा प्रयत्न करत आहे. मात्र, अशा पद्धतीने तयार केलेली लस कमी काळ टिकते. ध्याची मागणी आणि संसर्गाची परिस्थिती पाहता अनेक मुस्लिमबहुल देशांना पोर्क-मुक्त लस मिळण्याची खात्री नाही. त्यामुळे परंपरावादी मुस्लिम आणि ज्यू नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. डुकराच्या मांसाचे सेवन निषिद्ध असताना वैद्यकीय कारणांसाठी त्याचा वापर करणे धर्मनियमांमध्ये बसते का, अशी त्यांच्या मनांत शंका आहे. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात नाईट कर्फ्यू कसा असेल? महापौरांनी दिली माहिती
- पश्चिम बंगालमध्येही चालणार पवार पॉवर? ममतादीदींच्या मदतीसाठी शरद पवार जाणार धावून?
- Breaking: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे उद्यापासून राज्यात संचारबंदी; मुख्यमंत्री ठाकरेंनी उचललं महत्वाचं पाऊल
- संतापजनक! क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरची मालिका पडली बंद; कारण जाणून व्हाल हैराण
- ‘गांधी नाही तर फक्त नरेंद्र मोदीच या देशाचं भविष्य’