fbpx

देशाची सुरक्षा महत्वाची ; ‘या’ महाविद्यालयाने घेतला बुरखाबंदीचा निर्णय !

burkha

टीम महाराष्ट्र देशा : श्रीलंकेमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटात शेकडो सामान्य नागरिकांचे प्राण गेले आहेत, बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल यांनी साहस दाखवत देशात बुरखा आणि नकाबवर बंदी घातली आहे. हाच धागा पकडत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतात देखील बुरखा बंदी करण्याची मागणी केली होती. ‘सामना’ अग्रलेखातून राष्ट्रहितासाठी ही मागणी करत असल्याचं म्हंटले आहे.

दरम्यान, केरळमधील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या बुरखा घालण्यावर बंदी घातली गेली आहे. विशेष म्हणजे केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या अल्पसंख्याक महाविद्यालयात ही बंदी घालण्यात आली आहे. हे महाविद्यालय मुस्लिम एज्युकेशन सोसायटीमार्फत चालवले जाते.

दरम्यान,आता याच मुद्द्यावरून शिवसेना आणि एमआयएम मध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरु झालं आहे. बुरखाबंदीच्या निर्णयावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.