मुस्लीम बांधवांचा ऐतिहासिक निर्णय, ‘ईद’ला बकरी न कापता पूरग्रस्तांना करणार मदत

namaz muslim

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापुर मधील मुस्लीम समाजाने बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ‘बकरी ईद’ ला बकरीवर येणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय मुस्लीम समाजाने घेतला आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना त्यांचे जीवन पूर्ववत करण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

कोल्हापूरमधील मुस्लीम समाजाने ‘पूरग्रस्तांच्या अडचणी या पूर ओसरल्यानंतर अधिकच वाढणार आहेत. रोगराई बरोबर मुकाबला करावा लागेल. घरांची डागडुजी करावी लागेल. बेकारी व दारिद्र्य वाढीस लागेल. त्यामुळे राजश्री शाहू महाराज यांच्या करवीर नगरीतील मुस्लीम समाजाने सर्वानुमते एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . आता येत असणारी ‘बकरी ईद’ ला बकरीवर येणारा खर्च टाळून ती रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय झाला आहे.

तसेच सागंली जिल्हातील पूरग्रस्त भाग सोङून जे मुस्लीम बाधंव आहेत त्यांनी ही हा निर्णय घ्यावा आणि एका बोकडाचा जवळपास २० हजार रुपयांचा खर्च टाळून तो पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला जावा अस आवाहनही कोल्हापूरच्या मुस्लीम बांधवांनी केला आहे. त्यामुळे मुस्लीम समाजाने पूरग्रस्तांच्या प्रती जि भावना दाखवली आहे त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले. त्यामुळे मुस्लीम समाजाने घेतलेल्या निर्णयामुळे या नागरिकांना आर्थिक आधार मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या –