मुस्लिम समाजाने स्वरचित कोशातून बाहेर पडावे  – डॉ. शमशुद्दीन तांबोळी.

anty dowary

टीम महाराष्ट्र देशा: तोंडी तिहेरी तलाक प्रथा घटनाबाह्य आणि अवैध असल्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला तसेच येत्या ६ महिन्यात तसा कायदा करण्याचा आदेश सुद्धा केंद्र सरकारला दिला आहे. जगात २२ हून अधिक इस्लामिक देशांत तोंडी तलाक प्रथेला कायदेशीर मनाई आहे. परंतु आपल्या देशातील जमातवादी मुस्लिम आणि अखिल भारतीय मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळ या विषयावर समाजाची आणि मुस्लिम महिलांची दिशाभूल करत आहे. तेव्हा त्यांनी खरा इस्लाम
समजून घ्यावा आणि मुस्लिम समाजाने स्वरचित कोशातून बाहेर पडावे अशी अपेक्षा मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमशुद्दीन तांबोळी यांनी व्यक्त केली.

हुंडा विरोधी चळवळीच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्ताने चळवळीच्या महासचिव आशा कुलकर्णी यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीत ते बोलत होते. माजी कार्यकारिणी सभासद मेहेरुन्निसा दलवाई यांच्या स्मरणार्थ या वर्षी ३७ व्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेसाठी तोंडी तिहेरी तलाक प्रथा स्त्रीत्वाचा अपमान आहे हा विषय देण्यात आला होता. डॉ. तांबोळी यांचे हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली आणि चळवळीचा ४५ वा वार्षिक अहवाल प्रकाशित करण्यात आला.Loading…
Loading...