मुश्रीफांच्या अडचणी वाढल्या; २७०० पानी पुरावे घेवून सोमय्या पोहोचले ED कार्यालयात

kirit vs somayya

मुंबई : काल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून मुश्रीफ यांनी तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर सोमय्या यांनी आरोप केला होता.

दरम्यान आता 2700 पानी पुरावे घेऊन ईडीच्या कार्यालयात पोहोचले आहे. किरीट सोमय्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखानामध्ये कोट्यवधी रुपयांची बेनामी शेअर कॅपिटल भ्रष्टाचार झालेचे पुरावे घेऊन माजी खासदार किरीट सोमय्या ठरल्याप्रमाणे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात पोहोचले. ईडीमधील ४ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर बैठक झाली. कागदोपत्री पुरावे दिले आहेत, अशी माहिती सोमय्यांनी दिली आहे.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनची नावं मी जाहीर केली होती. दुर्दैवाने आता समोर राखीव नाव आले आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, जितेंद्र आव्हाड, यशवंत जाधव, यामिनी जाधव, अनिल परब, अनिल देशमुख, यांची नावं होती. आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश झाला आहे.’ असा टोला सोमय्या यांनी लगावला आहे.

काल किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर शेकडो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर लगेचच मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच यावेळी त्यांनी येत्या दोन आठवड्यांमध्ये किरीट सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या