मुश्रीफ तुम्ही शंभर काय हजार कोटींचा दावा टाका, पण…; चंद्रकांत पाटलांचे खुले आव्हान

chandrakant patil vs mushrif

पुणे : अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका मंत्री मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून डर्टी ११ व्यतिरिक्त राखीव खेळाडूच्या यादीत समाविष्ट केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला आहे.

यावर हसन मुश्रीफ यांनी प्रतक्रिया देताना, मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार आहे, असे सांगितले. तसेच किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत, असा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील आणि समरजित घाटगे यांना देखील लक्ष्य केलं.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेचा व अब्रुनुकसानीचा चांगलाच समाचार घेतला आहे.

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. सोमय्यांवर मुश्रीफ शंभर कोटींचा दावा दाखल करणार आहेत. ही त्यांची कार्यपद्धतीच आहे. काही झालं की ते १००-२०० कोटींच्या दाव्याची भाषा करतात. अलीकडे इतके घोटाळे समोर येतायत कि १०० कोटींचा दावा ही छोटी रक्कम वाटतेय. किमान त्यांनी पाचशे-हजार कोटींचे अब्रुनुकसानीचा दावे करावेत. मात्र हे दावा करण्यासाठी कोर्टात 25 टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते. त्यामुळे त्या स्टॅम्प ड्युटीचे पैसे भरायला व्हाईट मनी आहे की नागरिक लोकवर्गणी जमा करून देणार आहेत हे पाहावं. कारण त्याला ब्लॅक मनी चालत नाही,’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :