Muscle Gain | मसल्स गेन करण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो

Muscle Gain | टीम कृषीनामा: आजकाल तरुणांमध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेझ खूप वेगाने वाढत आहे. सोशल मीडिया आणि चित्रपटांमुळे हा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यासाठी बहुतांश लोक जिममध्ये तासंतास घाम गाळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोटीनचे सेवन करतात. मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही व्यायामासोबतच आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकतात. या गोष्टीचे सेवन केल्याने मसल्स गेन करण्यास फायदा होतो. त्याचबरोबर या गोष्टींचे सेवन केल्याने आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पुढील गोष्टींचा समावेश करू शकतात.

शेंगदाणे (Peanuts For Muscle Gain)

शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. कोणत्याही ड्रायफ्रूटच्या तुलनेमध्ये शेंगदाण्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर यामध्ये माफक प्रमाणात 20 ओमीनो ॲसिड देखील उपलब्ध असते. मसल्स गेन करण्यासाठी शेंगदाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

बीन्स (Beans For Muscle Gain)

मसल्स गेन करण्यासाठी बीन्सचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि अमिनो ॲसिड आढळून येते. एक कप बीन्समध्ये सुमारे 15 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे मसल्स गेन करण्यासाठी बीन्सचे सेवन करणे उपयुक्त ठरू शकते.

पनीर (Paneer For Muscle Gain)

पनीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळून येते. 100 ग्राम पनीरमध्ये 20 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्यामुळे मसल्स गेन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात पनीरचा समावेश करू शकतात.

हरभरा (Gram For Muscle Gain)

वजन वाढवण्यासाठी आणि मसल्स गेन करण्यासाठी हरभऱ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. हरभऱ्यामध्ये प्रोटीन आणि फायबरसह अनेक पोषक घटक आढळून येतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. एक वाटी हरभऱ्यामध्ये 12 ग्राम फायबर उपलब्ध असते. त्यामुळे हरभऱ्याचे सेवन करणे आरोग्य आणि मसल्स गेन करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Snoring | घोरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

Ayurvedic Diet | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Skin Care With Tomato | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी टोमॅटोसोबत ‘या’ गोष्टींचा करा वापर

Pista Milk Benefits | दुधामध्ये पिस्ता उकळून प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Skin Care | चेहरा स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.