मुरमा गावात एकही समास्या ठेवणार नाही- रोहयो मंत्री संदीपान भुमरे

औरंगाबाद : रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांचा मुरमा ता.पैठण येथे दि.२१ रोजी सकाळी दहा वाजता गावात सत्कार संभारभ पार पडला. ते पैठण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गावात एकही समस्या राहणार नसल्याचे आश्वासन भाषणादरम्यान दिले.

यावेळी मंत्री भुमरे म्हणले,जायकवाडी धरणाच्या पाण्यातून पैठण तालुक्यातील एक ही गाव सुटणार नाही, त्यामूळे तालुक्यातील पाण्याची लवकरच समस्या मिटणार आहे. तसेच पाचोडसह परिसरात मुरमा,कोळीबोडखा,सानपवाडी या गावत पावसाळ्यात सतत वीजे समस्या राहत असल्याने केकत जळगाव ला ३३ केव्ही लाईन मंजूर होणार आहे. त्यानंतर या गावांची संपूर्ण विजेची समास्या मिटणार आहे.

तसेच मुरमा शिवारातील एकही रस्ता कच्चा राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांनी मोहगून जास्तीतजास्त लाभ घ्यावे,या मोहगूनी मधून प्रत्येक शेतकऱ्यांना २.५ लाख रूपये भेट असते.  ६१ शेतकऱ्यानी मोहगूणीची लागवड केली आहे. तसेच मुरमा-पाचोड हा रस्त्याचे लवकरच डाबंरीकरण सुरू करणार असून मुरम्याचे एकही काम राहणार नाही तसेच मुरम्यामध्ये व्यायाम शाळा, ड्रेजलाईन पण लवकरच करण्यात येईल तसेच पाचव्यादां निवडुन दिले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सानपवाडी या गावाचे ब्राह्मगाव्हाणच्या उपसा जलसिंचन मध्ये समाविष्ट करण्यात यावे. त्यासाठी मंत्री भुमरे यांनी कँबीनेटही मध्ये मागणी केली आहे.तर मुरमा येथिल दलित स्मशानभुमीचे काम अनेक दिवसापासून प्रलबिंत आहे ते लवकरच सोडविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे.

यावेळी शिवसैनिक, शिवसेना उपजिल्हाध्यक्ष विनोद बोंबले, कृषी बाजार समिती सभापती राजू भुमरे,पैठण पंचायत समिती उपसभापती कृष्णा भुमरे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे,उपसरपंच शिवाजी भालसिंगे,वडजी सरपंच भाऊसाहेब गोजरे,पाचोड खुर्दचे उपसरपंच नितिन वाघ,नंदू पठाडे,दादेगावचे नवनाथ हजारे,युवासेनेचे राहुल नरवडे, माजी सरपंच अरूण कळमकर,दिनकर मापारी आदींसह गावकरी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

IMP