Share

Murji Patel | अखेर ठरलं! ‘या’ पक्षाकडून मुरजी पटेल लढणार निवडणुक; आज अर्ज भरणार

मुंबई : भाजप पक्षाकडून उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरु केला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटाकडून उमेदवार उतरवण्याचे संकेत दिले जात होते. १४ ऑक्टोबर शुक्रवार रोजी निवडणुक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांना आज अर्ज दाखल करावा लागणार आहे. यापुर्वी मुरजी पटेल एकनाथ शिंदे गटाकडून लढणार होते. मात्र, आता त्यांचा पक्ष निश्चित झाला आहे.

मुरजी पटेल भाजप कडून लढणार –

भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना झाल्यास ऋतुजा लटकेंना सहानुभूती मिळेल, असं भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला वाटत होतं. त्यामुळेच मुरजी पटेलांना शिंदेंच्या पक्षाकडून रिंगणात उतरवून शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत घडवून आणण्याची रणनीती असल्याच्या चर्चा होती. मात्र, आता मुरजी पटेल भाजप कडून लढणार असल्याचं निश्चित झालं आहे.

मुरजी पटेल त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला जाणार होते. मात्र, हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणांमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. आशिष शेलार आणि अन्य वरिष्ठ भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता मुरजी पटेल अर्ज भरण्यासाठी जातील, असं भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ऐनवेळी मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अंधेरी (पूर्व) पोट निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या महापालिकेमध्ये कार्यरत होत्या. त्यांच्या राजीनामावरुन चांगलाच वाद पेटला होता. अशातच त्यांना दिलासा मिळाला असून आज त्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : भाजप पक्षाकडून उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरु केला होता. मात्र, गेल्या दोन …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now