चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन तरुणाची हत्या.

studant crime

पुण्यातील बाणेर रोड परिसरात चहा पिताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. अख्तर खान असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी झालेल्या या घटनेचा चतुश्रुंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास बाणेर रोडवरील सकाळनगर येथील बसस्टॉप जवळ अख्तर इम्तियाज खान (वय २०, रा. इंदिरा वसाहत) आणि करीम सय्यद (वय २४, रा. इंदिरा वसाहत) हे दोघेजण चहाच्या टपरीवर चहा पीत उभे होते. त्यावेळी शेजारी उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्यांचा धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या आरोपीने अख्तर खान आणि करीम सय्यद यांच्यावर कुकरीने वार केले. या हल्ल्यात अख्तर खान याचा मृत्यू झाला असून करीम सय्यद गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आरोपी पसार झाला चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.आहे.