fbpx

केवळ ४ रुपयांसाठी चाकूने भोसकून हत्या

crime -murder

नालासोपारा : अंडा पाव खाऊन झाल्यानंतर ४ रुपये कमी दिले म्हणून इसमाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. गोरखनाथ उर्फ रवी भागवत (४०) असे या इसमाचे नाव आहे. या घटनेनंतर त्याला कांदिवलीमधील जनशताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच्या पालिका परिवहन कार्यालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे ततर एक जण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रवी भागवत हे कचरा वेचण्याचे काम करत होते. त्यांनी १२ रुपये प्रमाणे दोन अंडापाव घेतले. मात्र त्यांनी २४ रुपयांऐवजी २० रुपये दिले होते. यावरुन अंडा विक्रेता, त्याचे साथीदार आणि रवी भागवत यांच्यात वाद झाले. दरम्यान याप्रकरणी तक्रार नोंदवण्यास हयगय केल्याप्रकरणी दोन जणांचे निलंबन करण्यात आले आहे.