पुण्याच्या महापौरांनी उडवली संजय राऊत यांची खिल्ली; म्हणाले…

पुण्याच्या महापौरांनी उडवली संजय राऊत यांची खिल्ली; म्हणाले...

पुणे : शिवसेनेचे खासदार तसेच सामनाचे संपादक संजय राऊत यांनी काल पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी अनेक गोष्टी माध्यमांना सांगितल्या त्यामध्ये काँग्रेस , शिवसेना ,राष्ट्रवादीचाही उल्लेख करताना आम्ही जुळवून घेण्याचा प्रयत्न करू असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चां चांगल्याच तापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी राज्यात अनेक पॅटर्न येतात आणि जातात. पण सध्या महाराष्ट्रात ठाकरे-पवार पॅटर्नचा बोलबाला आहे असेही राउत म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे सातत्यानं पुण्यात येत असत आम्ही पुण्यात संघटनेचं काम करत असतो तरी आमचा पुण्यात महापौर बसू शकला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांची आणि पुणेकरांची इच्छा आहे आणि आमचं स्वप्न आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांवर शिवसेनेचा महापौर असावा असंही राऊत म्हणाले.

दरम्यान काल राऊत यांच्या वक्तव्याला आज पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी समाज माध्यमाद्वारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांनी त्यात म्हटले आहे.अहो संजय जी पुण्यात तुमचे एकूण नगरसेवक १० आणि दावा महापौरपदाचा, महत्त्वाकांक्षा असावी पण किमान आवाक्यातली तरी महापौरपदासाठी १० चे ८५ नगरसेवक करावे लागतील याची माहिती आधी घ्या आणि मगच दावे करा असा टोला मोहोळ यांनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या