fbpx

पालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दरांवर कारवाईला सुरुवात 

pune mahapalika125

पुणे – पुणे महापालिका इमारतीच्या परिसरात थुंकणाऱ्यांवर प्रशासनानं दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी 11 जणांकडून प्रत्येकाकडून 150 रुपये प्रमाणं 1 हजार 650 रुपये वसूल करण्यात आलं. स्वच्छ सर्वेक्षण 2019 अंतर्गत रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या, लघवी करणा-या आणि कचरा टाकून घाण करणा-यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनानं हाती घेतली आहे.

पुणे महापालिका प्रशासनानं मुख्य इमारतीसह स्वमालकीच्या विविध इमारतीत घनकचरा व्यवस्थापन नियमांची प्रभावी अंमलबजावणी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पालिकेनं पाच जणांचं स्वतंत्र पथक स्थापन केलं असून अस्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दीडशे रुपये दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार या पथकांना दिले आहेत. या शिवाय क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

योगी सरकारचा तुघलकी फतवा ; घातली लग्नाला बंदी

दरम्यान, भारतातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत प्रथम क्रमांक पटकवल्यानंतर पुणे महापालिका शहराच्या स्वच्छतेबद्दल अधिकच सतर्क झाल्याचे दिसत आहे. आधी रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड आणि स्वतः हाताने साफ करण्याची शिक्षा दिल्या नंतर आता प्रशासनाने आपला मोर्चा आता आपल्या इमारतींकडे वळवला आहे. त्यामुळे पालिका इमारतीतील पिचकारी बहाद्दर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.