औरंगाबाद- मनपाच्या विशेष सभेत नगरसेवक गैरहजर

औरंगाबाद- औरंगाबादमध्ये गेल्या एकोणवीस दिवसांपासून निर्माण झालेला  कचरा प्रश्न काही सुटतासुटत नसल्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी आज  सर्वसाधारण विशेष सभा घेतली मात्र या सभेला बहुसंख्य नगरसेवकच गैरहजर होते. मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी  कचरा प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी व त्याचे योग्यप्रकारे विघटन करण्यासाठी मालेगाव येथे राबवण्यात येत असलेल्या अनेक कचरा प्रकिया प्रक्लपांची माहिती दिली.

महापौरांनी फक्त गोल गोल उत्तरे देऊन नागरिकांची दिशाभूल करू नये, असे एमआयएम गटनेते नासेर सिद्दीकी म्हणाले. शहरामध्ये कचरा  टाकण्यासाठी पोलिसांचा वापर करून नागरिकांवर  दमदाटी केल्यामुळे हिसंक परीस्थिती निर्माण होईल, असे मत मिटमिटा येथील  नगरसेवक रावसाहेब आम्ले यांनी मांडले.

आपल्या वार्डातील नागरिकांना विश्वासात घेऊन नगरसेवकांनी कचरा व्यवस्थापन करावे, असे मत नगरसेवक राज वानखेडे यांनी व्यक्त केले. कच-याची योग्यप्रकारे व्हिलेवाट लावणार असल्याचे मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...