औरंगाबादेत महानगरपालिकेचे लसीकरण केंद्र बंद तर खासगीत ३८ हजार लसींचा साठा!

औरंगाबाद : कोरोनावर लस हाच एकमेव पर्याय असल्याचे बोलले जात असले तरीही शासनाकडून लसींचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने वारंवार लसीकरणास ब्रेक लागत आहे. शहरातील लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली असली तरीही खासगी रुग्णालयांमध्ये जोरदारपणे लसीकरण सुरु असून खासगीत जवळपास ३८ हजार लसी शिल्लक असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने पैसे मोजून लस घ्यावी लागत आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी प्रशासनातर्फे केली जात आहे. १८ ते ४४ वर्षावरील नागरिकांचे गतीने लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे शासनातर्फे लसीकरणाची गती वाढविण्याचे आदेश दिले जात आहेत. पण दुसरीकडे लसीच मिळत नसल्याने आठवड्यातले एक-दोन दिवसच लसीकरण होत असून, उर्वरित दिवशी केंद्र बंद राहत आहेत.

नागरिक लस कधी येणार? याची विचारणा करण्यासाठी केंद्रावर चरका मारत असल्याचे चित्र आहे. एकीकडे सरकारी लसीकरण केंद्र बंद असताना खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करून ती नागरिकांना देण्याची परवानगी केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालये नागरिकांकडून पैसे घेऊन लस देत आहेत. त्यासाठीचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. मोफत लसीसाठी लागणाऱ्या रांगा व वारंवार निर्माण होणारा तुटवडा यामुळे अनेक नागरिक पैसे मोजून लस घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP