महापालिका निवडणुकीसाठी लवकरच आरक्षण सोडत

टीम महाराष्ट्र देशा : महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभाग रचनेनुसारच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेला मंजुरी दिली असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरक्षण सोडत होणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर हरकती, आक्षेपसाठी वेळ दिला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना प्रभागरचना तयार करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभागरचनेचा आराखडा तयार करून तो जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सादर केला होता. विभागीय आयुक्तांनी तो आयोगाकडे सादर केला.

Loading...

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्याने प्रभागरचना रद्द होऊन पुन्हा वॉर्डपद्धतीने निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता; पण प्रभागरचनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. प्रभागरचना अद्याप जाहीर झालेली नाही; मात्र त्याआधी अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 18 डिसेंबरला सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आरक्षण सोडत होणार आहे.

प्रभागरचनेची अधिसूचना शुक्रवारी (ता.20) शासन राजपत्रात प्रसिद्ध होईल. त्यानंतर लगेचच त्यावर सूचना आणि हरकती घेण्यास सुरवात होईल. 30 डिसेंबरपर्यंत या सूचना आणि हरकती स्वीकारण्यात येतील. चार जानेवारीला सूचना आणि हरकतीचे विवरणपत्र निवडणूक आयोगास सादर केले जाईल, असे महापालिका आयुक्तांनी नमूद केले आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात प्रभागांचे चित्र अंतिम होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?