आजी-माजी महापौरांसाठीही महापालिकेचे दरवाजे बंद

पुणे: शहरात नव्याने लागू करण्यात येणारे पार्किंग धोरण आज मंजुरीसाठी महापालिका मुख्यसभेत मांडले जाणार आहे, भाजप वगळता विविध राजकीय पक्ष संघटना स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केला आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेचे सर्व गेट बंद करण्यात आले होते, यामुळे मात्र सामान्य नागरिकांसह महोदयांना देखील ताटकळत उभं राहावं लागलं होतं.

पालिका भवनाचे गेट देखील बंद करण्यात आल्याने माजी महापौर प्रशांत जगताप यांच्यासह अनेक नगरसेवकांना गेटवर थांबावे लागले. दरम्यान काही वेळाने महापौर मुक्ता टिळक या सभेसाठी दाखल झाल्याने त्यांना ही गेट बंद असल्याने काही काळ बाहेरच उभं राहावं लागलं, अखेर महापौरच अडकल्याच लक्षात आल्याने सुरक्षा यंत्रणेची पळापळ झाली आणि महापौरांच्या आत येण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

3 Comments

Click here to post a comment
Loading...