मुन्ना-बंटी वाद मिटणार ? पवारांच्या मध्यस्थीने कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप ?

टीम महाराष्ट्र देशा :लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २ एप्रिलला कोल्हापूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या नेत्यांच्या बैठकी घेणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि सतेज उर्फ बंटी पाटील हे महत्वाचे नेते आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुन्ना महाडिक व बंटी पाटील यांच्यात वाद सुरु आहेत. त्यामुळे त्यांच्या वादावर पडदा घालण्यासाठी पवारांचा हा दौरा महत्वाचा ठरणार आहे.

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडलेली आहे. गुरुवारी स्वभिमानीच्या राजू शेट्टी यांनी अर्ज दाखल केला यावेळी हे दोन्ही नेते उपस्थित होते. परंतु त्यांच्यातला वाद अद्यापही कायम असल्याचं चित्र दिसून आलं आहे.

Loading...

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकीय भुकंपासाठी ओळखले जातात. आजपर्यंतचा शरद पवार यांचा इतिहास आहे की, त्यांनी ज्या ठिकाणी जाऊन मुक्काम केला, त्या ठिकाणी मोठी राजकीय उलथापालथ झालेली पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे यावेळीही असाच मोठा भूकंप कोल्हापुरात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातला वाद शरद पवार कसा मिटवतात याची उत्सुकता सगळ्यांनाचं लागलेली आहे.

काय आहे धनंजय महाडिक आणि सतेज पाटील वाद ?

सतेज उर्फ बंटी पाटील हे कॉंग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार आहेत तर धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. खरतर यांच्यातील वादाला सुरुवात झाली ती २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून, या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पाठिंबा मागितला होता. सतेज पाटील यांनीही महाडिकांना मदत करण्याचं आश्वासन दिलं आणि जोरदार प्रचार करत दिलेलं आश्वासन पाळलं देखील, त्यामुळे मोदी लाटेतही धनंजय महाडिक खासदार म्हणून निवडून आले. या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्या विजयात सतेज पाटलांच्या सिंहाचा वाट होता.

लोकसभेनंतर विधानसभेत आघाडीत बिघाडी झाली त्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने वेग-वेगळ लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सतेज पाटील आणि अमल महाडिक यांच्यात लढत झाली. अमल महाडिक हे धनंजय महाडिक यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे या निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी सतेज पाटलांच्या विरोधात अमल महाडिक यांचा प्रचार केला. त्यामुळे सतेज पाटलांचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थाने वादाला सुरुवात झाली. लोकसभेसाठी केलेल्या मदतीची जाणीव न ठेवत महाडिक यांनी आपली फसवणूक केली असा आरोप सतेज पाटलांनी केला.

या सर्व घटनेचा बदला पाटलांनी २०१५ च्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत घेतला त्यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव केला. महादेवराव महाडीक हे धनंजय महाडिक यांचे चुलते आहेत.त्यामुळे हा वाद चिघळला. तेव्हापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुन्ना महाडिक व बंटी पाटील यांच्यात हाडवैर निर्माण झाले आहे. त्यानंतर जिल्हा परिषद, महापालिका, गोकुळ दूधसंघ निवडणूक किंवा साखर कारखान्याची निवडणूक अश्या प्रत्येक निवडणुकीत मुन्ना विरुद्ध बंटी असा संघर्ष पाहायला मिळाला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?