fbpx

‘न घाबरता लोकांनी मतदान केल्याने नक्षलवाद्यांनी हल्ला केला’ : सुधीर मुनगंटीवार

टीम महाराष्ट्र देशा : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाला गालगोट लागले आहे. आज माओवाद्यांनी सी- ६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्यात १५  जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या हल्ल्याची माहिती चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. माओवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचं सर्व स्तरातून तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त केला जात आहे.

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दानापूरमध्ये माओवाद्यांनी तब्बल ३० वाहने जाळली होती. या घटनेत ५ कोटी रुपयांपेक्षा जास्त अधिक मालमत्तेचं नुकसान झालं असल्याची माहिती आहे. माओवाद्यांनी केलेल्या या कृत्यामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ह्या भ्याड हल्ल्याचा कितीही निषेध केला तरी कमीच आहे. मतदारांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये शांततेत सहभाग नोंदवला. भीती केल्यानंतरही लोक मतदार केंद्रांपर्यंत पोहोचले याचा राग लक्षलवाद्यांच्या मनात होता. त्यातूनच हा हल्ला घडवला असे दिसतंय, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नक्षलवाद संपवण्याच्या दृष्टीने सरकार कठोर पावले उचलेल असेही मुनगंटीवार म्हणाले.