विदर्भात 8 महिन्यांमध्ये 15 वाघांचा मृत्यू- मुनगंटीवार

नागपूर : विदर्भातील जंगलांमध्ये जानेवारी ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्यांत 15 वाघांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे. यातील 10 वाघांचा मृत्यू नैसर्गिकरीत्या झाल्याचा दावा राज्य सरकारच्या वन विभागातर्फे करण्यात आला आहे.

यासंदर्भात विधानपरिषेदत संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रूपनवर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला दिलेल्या लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे. यासंदर्भात वनमंत्र्यांच्या उत्तरात नमूद केल्यानुसार गेल्या आठ महिन्यांत दोन वाघांचा मृत्यू विद्युत प्रवाहामुळे तर 3 वाघांच्या मृत्यू इतर कारणांमुळे झाला आहे.

वनविभागातील नागपुरातील खापा व ब्रम्हपुरीतील नागभीड या वनपरिक्षेत्रात शेतकऱ्यांनी शेतीत लावलेल्या विद्युत प्रवाहामुळे दोन वाघांचे मृत्यू झाले. तर उर्वरित तीन वाघांच्या मृत्यूप्रकरणात 17 आरोपींना अटक करण्यात आली, असे उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे.

You might also like
Comments
Loading...