स्वप्न पाहण्याचा प्रत्येकाला अधिकार मुनगंटीवारांचा शिवसेनेला टोला

नागपूर: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या शेरेबाजीचा आज, शुक्रवारी नगापुरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. लोकशाहीत प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार असल्याचा टोला मुनगंटीवार यांनी शिवसेनेला लगावला.

राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर शिवसेनेने गुजरात निवडणूक हा ट्रेलर होता. राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर आहे. तर २०१९ ला भाजपचा समाप्तीचा सिनेमा पाहा, अशा शब्दात टीकास्त्र सोडले होते. त्यावर आज, मुनगंटीवार यगपुरातून प्रत्युत्तर दिले. यासंदर्भात प्रसिध्दीमाध्यमांनी मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, काही लोक स्वप्न बघतात, भाजपचा राजस्थानमध्ये पराभव झाला म्हणजे त्यांना देशात आता त्यांना चांगले दिवस आले आहेत.यानिमित्ताने तरी त्यांना अच्छे दिन आले आहे,असे वाटत असं तरी यश आहे चिमटाही मुनगंटीवार यांनी शिवसेनेचे नाव न घेता काढला.

You might also like
Comments
Loading...