आरोग्य खात्याच्या भरतीवरून मुनगंटीवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

sudhir mungantiwar

मुंबई : कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर मोठी जबाबदारी होती. काही ठिकाणी कर्मचाऱ्यांची कमी जाणवत होती. आरोग्य यंत्रणेवरील ताण लक्षात घेता राज्याच्या आरोग्य विभागात १७ हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी ८ हजार ५०० पदांची भरती निघणार आहे.

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली होती. २८ फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात ५० टक्के जाभा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी औरंगाबादेत केली होती.

परंतु या भरती प्रक्रिया वर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. कोरोना सारखं संकट असूनही राज्य सरकारनं आरोग्य खात्याचं बजेट वाढवलं नाही. राज्य सरकारनं ४ मे रोजी आरोग्य खात्यात नोकरभरती करण्यास परवानगी दिली. पण, त्यांनी तेव्हापासून काहीच पावलं उचलली नाहीत. हे सरकार मे २०२० पासून नोकरभरती करु शकलं नाही, असा आरोप देखील मुनगंटीवारांनी केला.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक नेत्यांना करोनाची लागण झाली असून राज्यातील अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरादार टीका केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या