fbpx

नाशिक : मुंडेंच्या बदलीचा आनंद गगनात मावेना,भाजप महापौरांचा जल्लोष

टीम महाराष्ट्र देशा : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना बदलीचे पत्र मिळताच त्यांनी आपले आयुक्त कार्यालय सोडले. मुंढेंनी आयुक्त कार्यालय सोडल्याची बातमी कळताच, नाशिकच्यामहापौर रंजना भानसी यांच्या बंगल्याबाहेर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

दरम्यान,शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांची नाशिकच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. अवघ्या नऊ महिन्यांतच ही बदली झाल्यानं राजकीय वर्तुळासोबतच सामान्यांतही ही गोष्ट चर्चेचा विषय ठरली. आज मुंढेंनी महापालिका आयुक्त कार्यालय सोडताच भाजप समर्थकांनी फटक्यांची आतषबाजी केली. महापौर रंजना भानसी यांच्या रामायण या निवास्थानाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, महापौर रंजना भानसी यांनीही मुंढेंच्या बदलीवर समाधान व्यक्त केल आहे.

तुकाराम मुंडे यांची मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदी त्यांची बदली झाली आहे. तुकाराम मुंढे यांनी आज नाशिक महापालिकेत जाऊन आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटांतच मुंढेंना बदलीचे पत्र मिळाले. माझ्याकडे अद्याप बदलीसंदर्भातील काोणतीच ऑर्डर आली नाही, त्यामुळे मी नियमीत कामकाजाला सुरुवात केल्याचे सांगत मुंढे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. मात्र, अखेर मुंढेंना बदलीसंदर्भातील पत्र देण्यात आले आहे. त्यानुसार मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली आहे.

म्हणून केली तुकाराम मुंडेंची बदली; मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा