सुट्टीच्या दिवशीही मुंडेंच्या कामाचा धडाका ; अधिकाऱ्यांची उडाली दाणादाण

टीम महाराष्ट्र देशा: दिवस महाशिवरात्रीचा वेळ सकाळी ९ वाजून ३० मिनिटे महापालिकेला सुट्टी असताना देखील पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पंचवटी परिसराचा दौरा केला. रामकुंड तपोवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेऊन कार्यतत्परता कशाला म्हणतात याचं मूर्तीवंत उधाहरण सादर केलं.

bagdure

दरम्यान पाहणीयावेळी त्यांनी कर्मचाऱ्य़ांचा कामचुकार खपवून घेणार नाही असं स्पष्ट केलं. गेल्या दोन दिवसात सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा दिल्याचे स्पष्ट केलंय. यात पाणीपुरवठा अधिकारी आस्थापणचे दोन कर्मचारी तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे चार कर्मचारी आहेत. तर यापुढे खासगी भूखंडावर कचरा आढळला तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुंडेंनी दिले आहेत.

You might also like
Comments
Loading...