मुंडेवरील आरोप प्रकरणी वृत्तवाहिनीवर हक्कभंग?

dhananjay munde scam

टीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावरून विधिमंडळात दलाली सुरू असल्याचा गंभीर आरोप वृत्त वाहिनेने लावल्यानंतर सभागृहातील सत्तारुढ व विरोध पक्ष एक झाले. दरम्यान, संबंधित वृत्तवाहिनी विरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला असून हक्कभंग प्रस्तावावर अधिवेशन संपण्यापूर्वी विशेषाधिकार समितीने निर्णय घ्यावा, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत .

‘मटा’ने दिलेल्या वृत्तानुसार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरत आरोप करणाऱ्यांना धारेवर धरले आणि विधिमंडळाच्या विश्वासार्हतेबाबत निर्माण करण्यात आलेल्या प्रश्नचिन्हावर गंभीर चर्चाही केली. जनसामान्यांसाठी सुरु असलेल्या या लढाईत आज मी जिंकलो आणि सरकार हरले आहे. राज्यातील १२ कोटी जनतेशी बांधिलकी आहे. त्यामुळे कितीही आरोप झाले तरी लढा सुरुच राहील, असा निर्धार व्यक्त करून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी धनंजय मुंडे यांनी दर्शवली. धनंजय मुंडे यांची बदनामी केल्याबद्दल वृत्त वाहिनीविरुद्ध आमदार हेमंत टकले यांनी मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावावर अधिवेशन संपण्यापूर्वी विशेषाधिकार समितीने निर्णय घ्यावा, असे निर्देश सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आहेत .

काय आहे प्रकरण

वसई –विरारमधील ग्लोबल सिटी प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक असणारे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून तब्बल १९ कोटींची सेटलमेंट केल्याची माहिती खुद्द यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या प्रमोद दळवी नामक व्यक्तीने दिली आहे. याच घोटाळ्या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात येणार होता. आता हा प्रश्न विचारला जाऊ नये यासाठी २ कोटींची अजून एक सेटलमेंट करण्यात आली. ज्या सेटलमेंटमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना ५० लाख रुपये तर आमदार अनंत ठाकूर, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, मंत्रालयातील काही अधिकारी आणि वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांना उरलेले दीड कोटी देण्यात आल्याच दळवी यांनी सांगितल आहे. दरम्यान या सर्व सेटलमेंटबद्दलच्या ऑडियो देखील पुढे आल्या आहेत.