मुंडे साहेबांमुळे आम्ही दोन्ही राजे एकाच मंचावर –  खा. छत्रपती संभाजीराजे

uadyan raje

गोपीनाथ गड: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान , आज दोन राजे एकाच व्यासपिठावर पाहायला मिळाले.

छत्रपती संभाजीराजे म्हणाले,  या कार्यक्रमाला मी जाणीवपूर्वक आलो आहे. मला गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यक्रमाला येण्यास  निमंत्रण लागत नाही. हे आमच्या हक्काच ठिकाण आहे. आज दोन छत्रपती एका व्यासपीठावर बोलावून छत्रपतींचा मान गोपीनाथ मुंडेमुळे राखला गेला.  उदयनराजेंना  संभाजीराजे म्हणाले  “दोन्ही छत्रपती आज एकत्र आलोय तर यापुढे देखील आपल्या बहिणीसाठी एकत्र येऊ.”

दरम्यान, आज गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडे या भाषणाला सुरुवात करताना उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी सुरेश धस याचं स्वागत करताना भावी आमदार सुरेश धस असं म्हणत स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतानंतर धस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. प्रेक्षकांनी देखील धस यांच्या या उल्लेखला भरभरून दाद दिली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार संभाजीराजे भोसले, सहकारमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.