विजयी संकल्प मेळावा : गोपीनाथ मुंडेंच्या बालेकिल्ल्यातून शरद पवारांची पुन्हा डरकाळी

टीम महाराष्ट्र देशा : राजकारणामध्ये गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद पवार हा संघर्ष संपूर्ण राज्याने अनेकदा पाहिला होता. मात्र २०१९ साली पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बीड जिल्ह्यातूनच विजयी संकल्प मेळाव्याची सुरवात करण्याचा निर्धार केला आहे.

मुंडे विरुद्ध पवार या संघर्षाचा पुढचा अंक २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातच बघायला मिळणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी पूर्ण केली असून विजयी संकल्प मेळावे राज्यभरात घेण्यात येणार आहेत. यातील पहिली सभा ही बीड जिल्ह्यात होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. या संकल्प मेळाव्याविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं.

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते जयदत्त क्षीरसागर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आरतीला गेले होते. ते भाजपच्या दिवसेंदिवस अधिक जवळ चालल्याचं बघायला मिळतंय. एकीकडे राज्यातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सगळी शक्ती एकत्र करत असताना भाजपच्या जवळ जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संख्या वाढत चालली आहे. या भेटीबाबत मुंडे यांना विचारलं असता ते म्हणाले की, गणपती दर्शनाला जाणे गैर काय आहे? ‘पुरोगामी राज्यात राजकारणापलिकडे संबंध असतात. कोणी कोणाकडे ही दर्शनाला, आरतीला, प्रसादला जाऊ शकतो, जयदत्त क्षीरसागर यांनी वर्षावर जाणे मला गैर वाटत नाही’ असं मुंडे म्हणालेLoading…
Loading...