माणुसकीला  काळिमा फासणाऱ्या मुंडे दांपत्याला सक्त मजुरीची शिक्षा

टीम महाराष्ट्र देशा : माणुसकीला  काळिमा फासणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणा बाबत बीड जिल्हा न्यायालयाकडून आज महत्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. अवैध गर्भपात करणारे परळी येथील डॉ. सुदाम मुंडे आणि सहकारी यांना न्यायालयाने १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान या प्रकरणात डॉ. सुदाम मुंडे यांच्या पत्नी सरस्वती मुंडे देखील सहभागी होत्या. त्यामुळे डॉ.सुदाम मुंडे आणि सहकारी यांच्यामध्ये सरस्वती मुंडे यांना देखील शिक्षा देण्यात आली आहे. न्यायालयाने डॉ. मुंडे यांनी स्त्री भ्रूण हत्येचा कारखानाच उघडला होता असे मत नोंदवले आहे.