Share

Munde | मुंडे बहिण-भाऊ आले एकाच व्यासपीठावर अन् मग झालं असं काही की, सभागृहात नुसताच हश्शा पिकला

Munde | मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. बीडच्या परळी येथील कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा एकदा कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, लक्ष वेधलं ते धनंजय मुंडे यांच्या मिश्किलने.

श्रद्धा तुला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान कडून ब्लॅक चेक देते. जेवढी रक्कम तिला हवी आहे. तेवढी त्यांनी टाकावी फक्त चेक बाउन्स झाला नाही पाहिजे एवढी रक्कम टाकावे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

यालाच उत्तर देताना, पंकजाताईंनी आता श्रद्धाला चेक दिला आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. मात्र, एवढं म्हणताच पंकजा मुंडेंनी ‘त्यात पैसे टाका’ असं म्हणाल्या. त्यामुळे सभागृहात एकच हश्शा पिकली.

जरी त्या अकाउंट मधील पैसे कमी पडले, तर मी टाकेल अजून ही टाकत आहे. बहिणीने चेक दिला असला तरी भाऊ तो बाऊन्स होऊ देणार नाही, काळजी करू नको, असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Munde | मुंबई : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यातला राजकीय संघर्ष अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now