टाटा स्काय ब्युटी महिलांना स्वत:च्या सौंदर्याची व्याख्या धुडाळण्यास करणार प्रेरित

tata sky

टीम महाराष्ट्र देशा – , मेकअपमधील बारकावे, फॅशनचे ट्रेंड्स, मन आनंदी करणा-या स्किन केअर टिप्स आणि या क्षेत्रातील सर्वोत्तम असे बरेच काही… देशभरातील घराघरामध्ये हे सगळे आणण्याचे वचन टाटा स्कायने दिले आहे. यंदाच्या या उत्सवी काळात, टाटा स्काय या भारतातील आघाडीच्या कंटेट डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्मने एफद काऊच (एफटीसी) ब्युटी स्टुडिओ या अभिनेता सुनील शेट्टी यांच्या उपक्रमासह भागीदारी करत आपली नवीन इंटरऍक्टिव्ह सेवा सुरू केली आहे.

टाटा स्काय ब्युटी सौंदर्य मंत्र घरात आणेल. तुमच्या आवडत्या कलाकारांना स्टार बनवण्यात याच मंत्रांनी जादू केली आहे. ते तुम्हाला टिप्स देतील, मेकअपच्या ट्रिक्ससांगतील, स्किनकेअरबद्दल, नवनव्या फॅशन ट्रेण्ड्सबद्दल बोलतील. हे सगळे फक्त एक बटन दाबल्यास, समजण्यास अतिशय सोप्या अशा डीआयवाय स्वरुपात उपलब्ध होणार आहे. टाटा स्काय ब्युटीच्या शुभारंभप्रसंगी टाटा स्कायच्या मुख्य व्यावसायिक अधिकारी पल्लवी पुरी म्हणाल्या, सबस्क्राइबर्सना त्यांच्या आवडत्या विषयांमध्ये नवे काही शिकण्यासाठी, वाढ आणि सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या आणि प्रेरणा देणा-या इंटरॲक्टिव्ह म्हणजेच परस्परसंवादी सेवा टाटा स्कायने नियमित सादर केल्या आहेत. टाटा स्काय ब्युटी ही सेवा ग्रूमिंग, स्टायलिंग आणि काळजी घेण्यातील कौशल्ये वाढवण्यासाठी (डीआयवाय) आणि महिलांना कायमच छान वाटावे, त्यांच्यात आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी तयार करण्यात आली आहे.

Loading...

सौंदर्याची ही अनोखी पाककृती तयार करण्यासाठी टाटा स्कायने एफटीसी ब्युटी स्टुडियोशी हातमिळवणी केली आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून सौंदर्य आणि फॅशन क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ या सेवेत उपलब्ध होतील. एफटीसी ब्युटी स्टुडिओच्या सहकार्याने टाटा स्काय ब्युटीवर भरत ॲण्ड डोरीस, अंबिका पिल्लई, सुभाष सिंग, शान मू, आलिम हकीम, अंजू मोदी, तरुण ताहिलिआनी,कविता भारतीय, पायल जैन यांसारखे सेलिब्रिटी मेकअप एक्सपर्ट आणि स्टायलिस्ट तसेच डॉ. स्वाती महेश्‍वरी यांच्यासारखे स्किन केअर एक्सपर्ट मिळून तुमच्या दिवाणखानाच्या आरामदायी वातावरणात बॉलिवुडचे ग्लॅमर निर्माण करतील. या सेवेत श्रुती आनंद, नूरिन शा, हेशा चीमा यांसारखे सोशल मिडियावरील तज्ज्ञही उपलब्ध असतील.

सुनील शेट्टी म्हणाला, टाटा स्कायसोबत फिटनेस आणि ॲक्टिंग अड्डा सुरू केल्यानंतर आता मी टाटा स्कायसोबत एफटीसी ब्युटीस्टुडिओच्या रुपाने आणखी एक सहयोग जोडण्यास उत्सुक आहे. देशातील प्रत्येक घरात कौतुक होईल आणि उपयुक्त ठरेल, अशी ही सेवा आहे.

आजघडीला, ब्युटी, मेकअप, फॅशन आणि स्किनकेअर संदर्भात प्रत्येकासाठी २४x७, नॉन-स्टॉप उपलब्ध असणारी ही एकमेव सेवा आहे. या सेवेतील एक अनोखा भाग म्हणाजे यात किड्स स्पेशल विभागात मुलांच्या हेअर स्टाइल आणि फॅशन ट्रेण्ड्ससंदर्भात अपडेट्स दिले जातील. या सेवेत जिंदगी खुबसुरत है हा संडे स्पेशल कार्यक्रम आणि टीव्ही कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात डोकावून पाहण्याची संधी देणारा सास, बहु और ब्युटी हा आगळावेगळा कार्यक्रमही असेल. एफटीसी टॅलेंट मिडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सहसंस्थापक आाणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय वत्स म्हणाले, नाविन्यपूर्ण कंटेटची निर्मिती करणे आणि आमच्या वापरकर्त्यांना आमच्या सेवा सहज उपलब्ध करून देणे, हेच एफटीसीमध्ये आमचे कायम उद्दिष्ट राहिले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!