मुंबईकरांच्या लापरवाहीमुळेचं मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना घडतात : महापौर महाडेश्वर

टीम महाराष्ट्र देशा : गोरेगावमधील दिव्यांश सिंह नावाचा एक दीड वर्षांचा लहानगा नाल्यात पडून वाहून गेला आहे. या घटनेनंतर मुंबईकरांनी बीएमसीला दोषी ठरवले आहे. मात्र यावर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मुंबईकरांनाचं दोषी ठरवले आहे. स्थानिक लोकांच्या लापरवाहीमुळे मुंबईमध्ये वारंवार अशा घटना घडत असल्याच त्यांनी म्हंटल आहे.

दिव्यांश सिंहच्या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटना स्थळी भेट दिली. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाडेश्वर म्हणाले की, स्थानिक लोक अनेकदा गटारे तोडतात. गटारांमध्ये कचरा टाकण्यासाठी स्थानिक लोक गटारांवरील झाकणं काढतात. पालिका नेहमी विनंती करत असते, असे करु नका, परंतु काही लोक याची पुनरावृत्ती करत असतात. त्यामुळे अशा घटना वारंवार घडतात. तसेच दिव्यांशच्या आईने त्याची काळजी घ्यायला हवी होती, असे देखील ते म्हणाले.

Loading...

दरम्यान याबाबत महाडेश्वर यांनी गटारावरचं झाकण उघडं का होतं? स्थानिकांनी गटारावरचं झाकण तोडलं होतं का? प्रशासनानेच गटारावर झाकण बसवलं नव्हत का? याबाबतच्या कठोर चौकशीचे आदेश दिले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणावरून मनसेतील मतभिन्नता चव्हाट्यावर