मुंबईच्या डबेवाल्यांनी केले पुण्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

blank

पुणे : मुंबईकर ग्राहकांचे डबे अचूक आणि वेळेवर पोहोचविणाऱ्या, आयएसओ आणि सिक्स सिग्मा प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे ‘सप्लाय चेन मॅनेजमेंट ‘ ,’इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ‘या विषयावरचे मार्गदर्शन व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते .

blank

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘मध्ये ३० मार्च रोजी हा कार्यक्रम झाला. ‘नूतन मुंबई टिफिन सर्व्हिसेस चॅरिटी ट्रस्ट ‘चे सचिव किरण गवंडे , बाळासाहेब भालेराव यांनी व्यवस्थापनशास्त्र विद्यार्थ्यांशी संवाद साधला .

आझम कॅम्पस (पुणे कॅम्प ) मधील हाय टेक हॉल येथे हा कार्यक्रम ३० मार्च सकाळी १० वाजता झाला. ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘चे संचालक डॉ . आर गणेसन यांनी स्वागत केले.या कार्यक्रमात त्यांचा सत्कार महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांच्याहस्ते करण्यात आला .