fbpx

मनसेची सेनेविरुद्ध कायदेशीर खेळी; नगरसेकांना पक्षाचा व्हीप

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी कायदेशीर खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे . मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या ६ नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आलाय.

राज ठाकरे यांच्याकडून पुढील सूचना येईपर्यंत महापालिका सभागृहात तसेच समिती बैठकांमध्ये मतदान करु नये, असा व्हीप बजवण्यात आला आहे. व्हीपचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सहा नगरसेवक जरी शिवसेनेत गेले असले तरी तांत्रिकदृष्टी ते मनसेत आहेत. तसा दावा मनसेनेने केलाय. फुटून शिवसेनेत गेलेले नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या अजून आमचेच, असे सांगत मनसेनेने त्यांना हा व्हीप बजवलाय आणि हा व्हीप बजावण्याचा अधिकार पक्षाला आहे असे मनसेकडून स्पष्ट करण्यात आले आहे

दोन नगरसेवकांवर गुन्हा दाखल होणार?

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या दोन नगरसेवकांवर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग अर्थात एसीबी गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत आहे. परमेश्वर कदम आणि दिलीप लांडे या नगरसेवकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

मनसेत राहिलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे आणि भाजपने याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती.

शिवसेनेने कोट्यवधी रुपये देऊन नगरसेवक फोडले, तसंच त्यांनी घोडेबाजार केल्याचा आरोप, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्याबाबतची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.

 

 

1 Comment

Click here to post a comment