‘फरार आरोपींना संघटनात्मक पाठिंबा देणाऱ्यांची पाळमुळं खणून काढा

मुंबई हायकोर्टानं सीबीआय आणि एसआयटीला दिला आदेश

मुंबई : अनिस चे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ . गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील फरारी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला दिले आहेत. आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांच्यावर खून केल्याचा आरोप आहे .

डॉ. दाभोळकरांची 20 ऑगस्ट 2013ला पुण्यात तर पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2014ला कोल्हापूरात हत्या करण्यात आली होती. या खून प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत.कोल्हापूर पोलिसांनीही सारंग अकोलकरला पकडणाऱ्यास मोठे बक्षीस काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते.मात्र अद्याप आरोपींची ठोस माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागलेली नाही . आरोपी मोकाटच असल्याप्रकरणी भाष्य करताना हायकोर्ट म्हणालं
,’फरार आरोपींना संघटनात्मक पाठिंबा असल्याशिवाय ते असे फरार राहू शकत नाहीत.त्यांची पाळमुळं खणून काढा. फरारींना फक्त आर्थिक नाही तर इतरही मदत मिळत असणार. त्याचा तंत्रज्ञानाच्या मदतीने शोध घ्या’.नरेंद्र दाभोलकर आणि काॅम्रेड गोविंद यांच्या हत्या प्रकरणातील फरारी आरोपी सारंग आकोलकर आणि विनय पवार यांचा शोध आव्हान म्हणून करा असा आदेश मुंबई हायकोर्टानं सीबीआय आणि एसआयटीला दिला आहे
दरम्यान फरारी रेल्वेनं पळून गेले असल्याचा दावा तपासयंत्रणांनी केला आहे. दोघांचेही मोबाईल नंबर शोधून काढल्याची माहितीही तपासयंत्रणांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात एन.आय.एला प्रतिवादी करावं अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

You might also like
Comments
Loading...