‘उत्तर भारतीय लोकच मुंबई चालवतात, त्यांनी ठरवलं तर मुंबई-महाराष्ट्र ठप्प होईल’

नागपूर : मुंबई आणि महाराष्ट्र उत्तर भारतीय चालवतात. जर फक्त एक दिवस उत्तर भारतीयांनी काम केले नाही तर मुंबई थांबेल, असं वक्तव्य मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलं. नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेमध्ये निरुपम यांनी ही धमकी दिली आहे. या विधानामुळे नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.नागपुरात उत्तर भारतीयांच्या वार्षिक सभेत बोलताना निरुपम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय निरूपम ?
“लक्षात ठेवा उत्तर भारतीय वर्ग महाराष्ट्र चालवतो… मुंबईला चालवतो… दूध, भाजी, वर्तमानपत्र विकून आणि ऑटो टॅक्सी चालवून उत्तर भारतीय समाजच मुंबईकरांचे जीवन चालवितो… उत्तर भारतीय समाज स्वतःच्या खांद्यावर मुंबईकरांचे ओझे वाहतो… जर एके दिवशी उत्तर भारतीयांनी ठरवलं की आज कामावर जायचं नाही आणि फक्त एक दिवस काम केलं नाही तर पूर्ण मंबई ठप्प होईल… मुंबईच्या लोकांना जेवायलाही मिळणार नाही… आमची तशी इच्छा नाही… मात्र त्यासाठी आम्हाला मजबूर करू नका,” अशी धमकीच संजय निरुपम यांनी दिली.

वजुभाई वाला निष्ठावान कुत्रा; निरुपमांची जीभ घसरली