सालाबाद प्रमाणे मुंबई हरणार सलामीचा सामना ?

mi vs rcb

मुंबई : आयपीएलच्या 14 पर्वाला आज पासून सुरुवात होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील यशानंतर भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. आजचा पहिला सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर  यांच्यात होणार आहे. आज साडे सात वाजता चेन्नईच्या चिन्नास्वामी मैदानावरुन हा सामना होणार आहे.

या मोसमातही मुंबईची टीम भक्कम असून पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठीची प्रबळ दावेदार आहे. यंदाची आयपील ट्रॉफी जिंकुन मुंबई इंडियन्स आयपीएलमध्ये हॅटट्रीक साधण्याच्या दृष्टीने उतरणार आहे. आणि कर्णधार रोहित शर्माही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.

मात्र, आयपीएल 2021 चा हा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स गमावणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात मुंबईचे जिंकणे अशक्य आहे. असे आम्ही नाही मुंबई इंडियन्सचा इतिहास सांगत आहे. होय दोन वर्षानंतर भारतात परतणार्‍या या स्पर्धेची सुरुवात पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पराभवाने होऊ शकते, असा दावा आजवरचा इतिहास पाहून केला जात आहे. 2013 पासून दरवर्षी सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :