आयपीएलमध्ये आज मुंबई विरुद्ध हैदराबाद; सामन्यावर कोरोनाचे सावट कायम

दिल्ली : आयपीएलमध्ये मंगळवारी दिल्ली येथे मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात सामना होणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी या मैदानावरील ग्राउंड स्टाफमधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे हा सामना होणार का नाही अजुनही याबाबत काहीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

या सामन्याच्या एक दिवस आधी आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. ३ मे रोजी सकाळच्या सत्रात केकेआरच्या संघातील दोन खेळाडूंना कोरनाची लागण झाली. यानंतर दुपारपर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघातील तीन सदस्यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. या वृत्तानंतर दिल्ली येथील मैदानातील ५ ग्राउंड स्टाफला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. यानंतर मंगळवारी होणारा आयपीएलचा सामना याच मैदानावर होणार होता.

मात्र हा सामना होणार की पुढे ढकलण्यात आला. याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सुत्राच्या माहितीनुसार मुंबई-चेन्नई सामना संपल्यानंतर मुंबईच्या खेळाडू हे काही वेळ लक्ष्मीपती बालाजी सोबत होते. यानंतर दुसऱ्या दिवशी बालाजीचा कोरोना अहवाल सकारात्मक आला. यानंतर मुंबईच्या खेळाडूंनाही विलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर आजचा सामना होणार का नाही याबाबत अनिश्चीतता आहे.

महत्वाच्या बातम्या