युवा सेनेचा दणका! झाकीर नाईकची सन्मानीय माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून हकालपट्टी

aaditya thakare

मुंबई: मुंबई विद्यापीठात युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना धूळ चारत सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकल्या. त्यानंतर लगेच युवा सेनेने जगभरातील दहशतवाद्याचे प्रेरणास्थान असलेल्या झाकीर नाईकचे नाव मुंबई विद्यपीठाच्या सन्मानीय माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून काढण्याची मागणी केली. याची दाखल घेत विद्यापीठाने झाकीर नाईकचे नाव यादीतून काढले आहे.

Loading...

झाकीर नाईक हा स्वयंघोषित मुस्लिम धर्मगुरू असून आयआरएफ या संस्थेचे इसिसशी संबंध आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने तिच्यावर बंदी घातली आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयएने झाकीर नाईकच्या विरोधात विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त करणे आणि चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. झाकीर नाईक जुलै २०१६ पासून देशाबाहेर आहे.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक जिंकताच युवा सेनेने जोरदार दणका दिला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतलेली मेहनत महत्वाची होती.Loading…


Loading…

Loading...