fbpx

मुंबई : सिनेट सदस्यांनी पहिल्यांदाच कुलगुरुंच्या दालनात केले आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा- विद्यार्थ्यांच्या कोणत्याही समस्यांबाबत मुंबई विद्यापीठाकडून कोणताही ठोस निर्णय लागत नसल्यामुळे शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार इतिहासात पहिल्यांदाच कुलगुरुंच्या दालनात विद्यार्थ्यांसाठी युवासेना सिनेट सदस्यांचे आंदोलन केले. कुलगुरु सुहास पेडणेकर सर यांच्याकडून आक्रमक झालेल्या सिनेट सदस्यांनी चर्चा करून लेखी स्वरुपात मागण्या मान्य करुन घेतल्या.

लेखी स्वरुपात मान्य करुन घेतलेल्या मागण्या

1. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्यांची बैठक

2. ह्या १४ डिसेंबर २०१८ रोजी, कुलगुरु आढावा बैठक व इतर मागणी संधर्बात आराखडा देणार

3. यापुढे सिनेट सदस्य व विद्यार्थी संघटनांच्या पत्रांना विद्यापीठा कडून तातडीने उत्तर देण्यात येतील.

4. कलिना कैंपस, ठाणे उपकेन्द्र, कल्याण उपकेंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्यात येतील

5. कलिना कैंपस मध्ये WiFi व CCTV कॅमेरा बसविन्याचा आराखडा १४ डिसेंबरच्या बैठकीमध्ये देणार.

6. मादाम कामा हॉस्टेल फीस बाबत निर्णय घेण्यासाठी आपल्या महिला सिनेट सदस्यांची नेमणूक करुन त्यांनी याबाबत पाठपुरावा करुन सामूहिक निर्णय घेण्याचे ठरले.

7. Mobile App (IT) बाबत ताबड़तोब लक्ष देण्यास सांगितले. सीनेट सदस्य स्वतः याची पाहणी करणार. काही त्रुटी असतील तर त्याचे निवारण करणार.

मराठ्यांच्या वज्रमुठीने सरकार नरमले; मान्य केल्या या मागण्या

महापालिकांमध्ये महिनाभरात शिक्षण समिती स्थापन करणार – विनोद तावडे