मुंबई तुंबते आणि नागपूर मात्र अतिवृष्टीने भरते…! हा कसला न्याय…?

मुंबई/प्राजक्त झावरे-पाटील : यंदा जूनमध्ये वरुणराजा चांगला बरसला असून जुलै मध्येही चांगली सुरवात झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार यंदा पाऊस चांगला होण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे सगळीकडेच प्रशासनाची दाणादाण उडालेली दिसत आहे. एप्रिल पासूनच पावसाचे वेध लागतात आणि स्थानिक प्रशासन पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे आपल्या अजेंड्यावर आणते. परंतु तरीही पाऊस येईपर्यंत ही कामे पूर्ण होता होता प्रशासनाच्या नाकी दम येतो आणि प्रत्येक पावसाळ्याप्रमाणे जी व्हायची ती धांदल उडालेली दिसून येते.

Loading...

प्रशासनाचा कामातील ढिम्मपणा पावसाळ्यातील उदभवणाऱ्या प्रश्नांना कारणीभूत आहेच परंतु नागरिकांचीही जबाबदारी तेवढीच आहे. प्लॅस्टिक हे नाले तुंबण्यासाठी सर्वाधिक जबाबदार असल्याचा अहवाल हे अधोरेखित करतोच. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक शहरांमध्ये सखल भागात पाणी साठत असल्याने पाणी तुंबत असतेच. परंतु नेहमीच फक्त ‘मुंबईची तुंबई’ हाच जयघोष होत असतो. मुंबई शहर हे सात बेटांनी बनलेले आणि समुद्रसपाटीवर वसलेले शहर आहे. या शहराची लोकसंख्या , घनता या बाबत न बोललेच बरे. त्यामुळे नागरी वस्त्यांवर ताण येतो. डोंगर पोखरून, खारफुटीवर भर घालून, नदी पात्रात भराव टाकून वस्त्या उभ्या राहत आहे. त्याच वस्त्यांमध्ये पाणी भरले की पाणी तुंबले म्हणून आरडाओरड सुरू होतो. नेहमीच मुंबई महापालिकेची पाणी तुंबण्यावरून खरडपट्टी काढली जाते. मुंबईची तुंबापुरी म्हणून खिल्ली उडवली जाते परंतु हाच न्याय दुसऱ्या शहरां अजिबात लागू केला जात नाही. गुजरातसह राजधानी दिल्ली आणि इतर राज्यातील अनेक शहरांचे तुंबलेले फोटो नेहमी येत असतात.

काल-आज नागपुरात झालेल्या पावसाने विधानभवन अंधारात तर गेलेच परंतु बहुतेक रस्त्यांनी जलाशयाचे घेतलेले रुपडे तुंबई झाले म्हणण्या इतके गोंडस ही नाहीत का..? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर महानगरपालिका याला जबाबदार नाही ही तर अतिवृष्टीने झालेली वाताहत आहे अश्या चर्चा केल्या जातात. थोडक्यात काय तर मुंबई ला वेगळा न्याय आणि इतर शहरांना वेगळा न्याय का दिला जातो, हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित आहे.. मुंबईच्या तुंबण्यामागे राजकारण हेच कारण आहे की काय, असा प्रश्नार्थी उत्तर याने मिळते, हेच सत्य..Loading…


Loading…

Loading...