मिका म्हणतो ‘हमारा पाकिस्तान’

मिका आता महाराष्ट्रात माईक पकडूनच दाखव ; मनसेचा इशारा

मुंबई : गायक मिका सिंह हा नेहमीच वादात अडकत असतो , आता मिका सिंह नव्या वादात अडकला आहे. येत्या 12 आणि 13 ऑगस्टला शिकागो आणि ह्युस्टन इथे मिका सिंहचा कार्यक्रम होणार आहे. या कॉन्सर्टपूर्वी मिकाने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ‘हमारा हिन्दुस्तान 15 अगस्त को आजाद हुआ था और 14 को हमारा पाकिस्तान आजाद हुआ था,’ असं मिका या व्हिडीओत म्हणाला. मिकाचं ‘हमारा पाकिस्तान’ म्हणणं भारतीयांना चांगलच खटकलं आहे.

यावरून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ‘मिका आता महाराष्ट्रात माईक पकडूनच दाखव’ अशी धमकी दिली आहे .

bagdure

यापूर्वी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याच्या प्रकरणावरून करण जोहर च्या ‘ए दिल है मुशकील’ चित्रपटाच्या प्रदर्शनात मनसेने चांगलेच अडथळे आणले होते, पण नंतर करण जोहर याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मनधरणी केल्यानंतर मनसेचा विरोध मावळला होता . आता मिकाच्या या पोस्ट नंतर पुढे वातावरण अजून तापणार हे मात्र नक्की .

पहा नक्की काय म्हणाला आहे गायक मिका सिंह 

You might also like
Comments
Loading...