fbpx

मुलुंडमध्ये तरुणाची वाहतूक पोलिसाला मारहाण

वाहतूक पोलिस

मुंबई  : मुलुंडमध्ये एका तरुणाने वाहतूक पोलिसावर हात उचलत त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. महिला स्वच्छतागृहाजवळ उभ राहून तरुणींना त्रास देणाऱ्या टवाळखोराला एका तरुणीच्या कुटुंबिय जाब विचारत होते. यावेळी त्यांच्यामध्ये वाद सुरु झाल्याने वाहतूक पोलीस विलास कांबळी यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे छेडछाड करणाऱ्या तरुणाने कांबळे यांनाच मारहाण केली.

दरम्यान, आरोपीला अखेर मुलुंड पोलीस ठाण्यात नेण्यात आलें. स्वच्छतागृहाजवळ येणाऱ्या तरुणींकडे हा तरुण मोबाईल क्रमांक मागत असू तुम्हाला जॉब देतो, असे सांगत तरुणींना त्रास देत असे. मात्र, आपण राज्य शासनाच्या व्हिजिलन्स विभागात कार्यरत असल्याचा दावा आरोपीने केला होता.